Home > Blogs > Cardiology >  हदयरोगाची जोखीम कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक

हदयरोगाची जोखीम कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक

डब्ल्यूएचओअनुसार हदयरोगाचे मुख्य कारण हदय व रक्तवाहिन्यांमधील विकार आणि त्यामध्येहदयविकाराचा झटका,स्ट्रोक,उच्च रक्तदाब,परिघीय धमणींचा रोग,संधिवाताचाहदयविकार,जन्मजात असलेले हदयविकार आणि हदय निकामी होणे (हार्ट फेल्युअर)यांचा समावेश आहे.

दरवर्षी 17.7 दशलक्ष लोकं हदयविकाराने मृत्युमुखी पडतात.जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)नुसार यांमध्ये भारतातील संख्या एक पंचमांश आहे.आकडेवारीनुसार 2016 मध्ये हदयविकाराने होणार्‍या मृत्युच्या प्रमाणात 34 टक्कयांनी वाढझाली आहे,हे आपल्यासाठी मोठ्या काळजीचे कारण आहे.

सध्याहदयविकार हा फक्तज्येष्ठांपुरता सीमित नसून तरूणांमध्ये देखील दिसून येतआहे.अकाली येणारे हदयविकारांच्या झटक्यांकडे तातडीने लक्ष्य देण्याची गरजआहे.या अकाली उद्भवणार्‍या हदयविकारांना प्रामुख्याने धुम्रपान,तंबाखुचेसेवन जबाबदार असून त्याचबरोबर लोकांमध्ये वाढता मधुमेह,हदयविकाराचाकुटुंबामध्ये असलेला इतिहास हे देखील कारणीभूत आहेत.
या सर्वगोष्टींमुळे आपले लक्ष जीवनशैलीकडे वेधले जाते,जी भारतातील हदयविकारालाप्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे.व्यायामाचा अभाव,चुकीचा आहार,तंबाखू व मद्यसेवनामुळे होणारे दुष्परिणामव इतर हे सामान्य बदल करण्याजोगे जोखमीचे घटकम्हणून डबल्यूएचओ ने ओळखले आहे.डब्ल्यूएचओ अनुसार हे सामान्य बदलकरण्याजोगे जोखमीचे घटक नियंत्रणात आणल्यास हदयविकार आपण नियंत्रित करूशकतो किंवा टाळू शकतो.

आपणआजूबाजूला पाहू शकतो,की जीवनशैलीच्या बदलामुळे आपल्या दैनंदिनीमध्ये बदलझाला असून मोठ्या प्रमाणावर ताणपडत आहे.खास करून तरूणवर्गात रोजच्याताण-तणावामुळे मद्य व तंबाखूच्या सेवनामुळे वाढ होणे हे मोठ्या चिंतेचेकारण आहे.तंबाखूच्या सेवनामुळे धमनींच्या भिंतीमध्ये जळजळ,खराब कोलेस्ट्रॉलवाढू शकते,अडथळे निर्माण होऊ शकतात,ज्यामुळे हदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हदयविकाराच्याझटक्याला कारणीभूत ठरणार्‍या जोखमीच्या घटकांमध्ये मधुमेहाचा देखील समावेशआहे,जो प्रामुख्याने जीवनशैलीच्या बदलामुळे उद्भवतो.व्यायामाचाअभाव,खाण्याच्या चुकीच्या सवयी,चुकीच्या वेळेस खाणे,वाढता ताण-तणाव यामुळेदुर्देवाने घराघरांत मधुमेह बघायला मिळतो.मधुमेहामुळे उच्च रक्तदाब वधमनींच्या भिंतीमधील दाहकता वाढते ज्याचा संबंध हदयविकाराशी असतो.

म्हणूनचहदयविकाराशी संबंधितजोखमीचे घटक कमी करायचे असल्यास जीवनशैली बदलणे आवश्यकआहे.जॉगिंग,सायकलिंग,चालणेइत्यादी व्यायाम नियमितपणे करणे गरजेचे आहे.तसेचआपल्या आहारामध्ये कच्चा भाज्या व फळे यांचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचेआहे.वेळच्या वेळी आहाराबाबत सल्ला घेणे,प्रतिबंधात्मक तपासण्या यांमुळेआपण जोखीम कमी करू शकतो.

About Author

dr-supriya-puranik

Dr. Jagjeet Deshmukh

Panel Consultant

Contact: 8806252525
Email – ask@sahyadrihospitals.com

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post