Home > Blogs > Pulmonary Care > आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते?

आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते?

आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते?

स्ट्रोक हा आजार मेंदूला रक्तपुरविणार्‍या वाहिनीमध्ये अडथळा (क्लॉट) निर्माण झाल्यास किंवा या वाहिन्या फुटल्यास उद्भवू शकतो.जेव्हा असे होते तेव्हा मेंदूच्या काही भागाला गरज असलेले रक्त तसेच प्राणवायू मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कार्यावर परिणाम होतो.मेंदूतील पेशींचे पुनरूत्पादन होत नसल्याने मज्जातंतूतील पेशींना होणारे नुकसान हे कायमचे असते.फुटलेल्या रक्तवाहिन्यांमुळे स्ट्रोकबरोबर रक्तस्त्राव होऊ शकतो.याला हेमोराजिक किंवा ब्लिडिंग स्ट्रोक्स म्हणतात.

स्ट्रोकनंतर वेळीच उपचार केले नाहीत तर कुठल्या ना कुठल्या रूपात शारीरिक अक्षमतेबरोबर आयुष्य जगावे लागते.बर्‍याच जणांना स्ट्रोकनंतर आधीसारखे जीवन शक्य होत नाही,परंतु योग्य वेळेस उपचार आणि सहायतेमुळे अर्थपूर्ण जीवन शक्य आहे.

जोखमीचे घटक

सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की,स्ट्रोक हा प्रतिबंधात्मक आजार असून त्याचे अनेक जोखमीचे घटक आहेत,त्यापैकी पाच महत्त्वाचे जोखमीचे घटक पुढीलप्रमाणे.उच्च रक्तदाब, मधुमेह,तंबाखू सेवन,हदयविकार आणि स्थूलता यांचा समावेश आहे.हे सर्व जोखमीचे घटक ओळखून कमी केल्यास स्ट्रोक होण्याची शक्यता कमी असते.

प्रतिबंधात्मक उपाय

स्ट्रोकसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे, व्यायामासह संतुलित आहार घेणे आणि स्ट्रोकच्या सर्व जोखमीच्या घटकांना प्रतिबंधित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपायांचे पालन केल्यास 70 ते 80 टक्क्यांपर्यंत स्ट्रोक टाळता येऊ शकतो आणि यासाठी सर्वसामान्य लोकांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. स्ट्रोक आलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये वेळेला अनन्य साधारण महत्त्व असते.एखाद्याला स्ट्रोक आल्यास ज्या हॉस्पिटलमध्ये स्ट्रोकच्या उपचाराकरिता सर्व सुविधा उपलब्ध असतील त्या ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे आहे.

लक्षणे

 • शरीराच्या एका बाजूला ताकत नसणे,ज्यात एक हात,पाय किंवा चेहरा वाकडा होणे.
 • स्पष्ट बोलण्यात अडथळा निर्माण होणे.
 • एक किंवा दोन्ही डोळ्यांना बघण्याचा त्रास.
 • तीव्र डोकेदुखी.
 • बेशुध्द होणे.

वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास वेळ न दवडता रूग्णाला स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे असते.

स्ट्रोक-रेडी हॉस्पिटल काय करतात

स्ट्रोक आलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये वेळेला अनन्य साधारण महत्त्व असते,कारण जितक्या लवकर स्ट्रोकवर उपचार करू तितक्या जलद गतीने योग्य परिणाम मिळू शकतात. पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये स्ट्रोक कोड कार्यरत करण्यात आला आहे,ज्याअंतर्गत हॉस्पिटलमध्ये स्ट्रोकचा रूग्ण दाखल झाल्याची घोेषणा केली जाते. या घोेषणेच्या माध्यमातून स्ट्रोकच्या रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स सज्ज राहतात. पुढील काही मिनिटांतच त्या रूग्णाचे सीटी स्कॅन किंवा एमआरआय केले जाते आणि रूग्णावर कोणत्या प्रकारचे उपचार करावे याचा निर्णय घेतला जातो.

नवीन उपचारपध्दतींमुळे एकदंर स्ट्रोकच्या उपचारपध्दतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला असेल तर,क्लॉट बर्स्टर्स औषधांचा वापर केला जातो.नावाप्रमाणेच हे औषध रक्तपुरविणार्‍या वाहिनीमध्ये अडथळा (क्लॉट) तोडण्यास किंवा विरघळण्यास मदत करतात.ज्यामुळे रूग्णाला बरे होण्यास मदत होते आणि त्याचा मृत्युपासून बचाव होतो. मात्र कधीकधी स्ट्रोक तीव्र स्वरूपाचा देखील असू शकतो ज्यामुळे एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रक्तवाहिन्यामध्ये कॅथेटर टाकून रक्तवाहिनी उघडली जाते. ही प्रक्रिया थोडी खर्चिक आहे, मात्र अन्य उपचार पध्दतींच्या तुलनेत जीव वाचविण्यास मदत करते.

एखाद्याला स्ट्रोक आल्यास त्या रुग्णाला जवळच्या स्ट्रोक-रेडी हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे आणि स्ट्रोक संबंधीच्या उपचार पद्धतीं वापरून उपचार करणे गरजेचे आहे. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो किंवा अपंगत्व देखील बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

याबरोबरच सह्याद्री हॉस्पिटल्स,पुणे चे स्ट्रोक रिहॅब युनिट कार्यरत आहे.

स्ट्रोक रिहॅब युनिट म्हणजे काय ?

जेव्हा एखाद्या रूग्णाला स्ट्रोक येतो आणि त्याला एखाद्या अपंगत्वातून जावे लागते,तेव्हा सह्याद्री हॉस्पिटल्सच्या स्ट्रोक रिहॅब युनिट मधील तज्ञ थेरपीस्ट रूग्णांना स्ट्रोक मुले आलेल्या शारीरिक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे मोठ्या संख्येने रूग्णांनाही मदत होते.

About Author

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Expert Doctors

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post