Home > Blogs > Neurology > स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व

स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व

स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व

जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे मेंदूमधील उतींना प्राणवायू आणि पोषक घटक मिळत नाहीत तेव्हा स्ट्रोक किंवा पक्षाघात होऊ शकतो. काही मिनिटांतच मेंदूतील पेशी नष्ट होण्यास सुरूवात होते. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आपात्कालीन स्थिती आहे आणि यावर लगेचच उपचार गरजेचे असतात. वेळेवर उपचार झाले तर मेंदूला होणारे नुकसान आणि इतर गुंतागुंत कमी होऊ शकते.

स्ट्रोकची लक्षणे खालीलप्रमाणे

  • बोलण्यामध्ये अडथळा जाणवणे
  • गोंधळणे
  • चेहर्‍याच्या एका बाजूला किंवा एका बाजूच्या हात किंवा पाय बधिर होणे किंवा अशक्तपणा जाणवणे
  • एक किंवा दोन्ही डोळ्यांनी बघायला त्रास जाणवणे
  • अचानक तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येणे
  • चालताना संतुलन व समन्वय नसणे.

स्ट्रोकच्या बाबतची लक्षणे दिसून तितक्यात लवकर नाहिशी देखील होतात.त्यामुळे थिंक फास्ट ( Think “FAST” ) याकडे लक्ष द्या.

  • F -फेस चेहर्‍याची एक बाजू घसरलेली जाणवत आहे का?
  • A -आर्म्स जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात वर करताना एक हात वर करण्यास अवघड जात असेल किंवा होत नसेल
  • S – स्पीच बोलण्यामध्ये अस्पष्टता जाणवत आहे का ?
  • T – टाईम अशा प्रकारची कोणतीही लक्षणे जाणवल्यास तातडीने रूग्णालयात न्या.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतील धमनीमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा त्याला इश्केमिक स्ट्रोक असे म्हणतात.,तर मेंदूतील रक्तवाहिनी जर फुटली हिमोरॅजिक स्ट्रोक असे म्हणतात.काही लोकांमध्ये मेंदूच्या भागाला होणारा रक्तपुरवठा तात्पुरता खंडित होऊ शकतो,त्याला ट्रान्झियंट इश्केमिक ऍटॅक म्हणतात.त्याची लक्षणे तात्पुरती असतात व लक्षणे कालांतराने नाहिशी होतात.

स्ट्रोकला कारणीभूत ठरणारे अनेक जोखमीचे घटक आहेत,त्यामध्ये उच्च रक्तदाब,धुम्रपान,कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी,मधुमेह,ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया,हृदयासंदर्भात आजार,कुटुंबामध्ये स्ट्रोकचा वैद्यकीय इतिहास,प्रमाणाबाहेर मद्यसेवन,स्थुलता,चुकीची जीवनशैली इत्यादींचा समावेश आहे.स्ट्रोक हा आजार सामान्यत: ५० वयाच्या पुढच्या लोकांमध्ये देखील होतो.

स्ट्रोकचे निदान करण्याकरिता रक्ताच्या चाचण्या,रक्तदाब तपासणे,सीटी स्कॅन,एमआरआय,अल्ट्रा साऊंड, इको कार्डिओग्राम,सेरेब्रल अँजिओग्राम रूग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार या चाचण्यांचा अवलंब केला जाऊ शकतो.

स्ट्रोकच्या उपचारपध्दतींमध्ये लक्षणीयरित्या सुधारणा झाल्या आहेत.यामध्ये स्ट्रोकनंतर साडेचार तासांच्या आत दिल्या जाणार्‍या क्लॉट बस्टिंग इंजेक्शनचा समावेश आहे.याशिवाय मेकॅनिकल थ्रॉम्बोक्टॉमी ही सहा तासाच्या आत करण्यात येणार्‍या प्रक्रियेचा समावेश आहे.या उपचारपध्दतींमुळे निर्माण झालेला क्लॉट किंवा अडथळा काढता येतो व पेशींना किंवा रक्तवाहिन्यांना होणारे नुकसान थांबविता येते.

स्ट्रोकची परिस्थिती उदभवू नये यासाठी उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे,आहारात कोलेस्ट्रॉल व चरबीचे प्रमाण कमी करणे,मधुमेह नियंत्रणात ठेवणे,धुम्रपान-मद्यपान यासारख्या सवयी टाळणे,नियमित व्यायाम करणे,आहारामध्ये फळे व भाज्यांचा समावेश करणे,ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप ऍप्निया हा विकार असल्यास उपचार घेणे आदींचा समावेश आहे.एकेकाळी पन्नाशीच्या पुढील लोकांमध्ये दिसून येणारा हा आजार आता तिशी-चाळीशीच्या लोकांमध्ये दिसून येत आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हे महत्त्वाचे ठरू शकतात.

Have queries or concern ?

    About Author

    Dr. Nasli R Ichaporia

    Dr. Nasli R Ichaporia

    Senior Consultant Neurologist & Director of Neurology Department, Nagar road
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1238" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222