Home > Blogs > Obstetrics And Gynaecology > अकाली रजोनिवृत्ती व दुष्परिणाम
अकाली रजोनिवृत्ती व दुष्परिणाम
आज OPD मधे एक सूनबाई सासुबाईंना घेऊन आल्या,वैतागलेल्या सूनबाईंची सासुबाईंवर होणारी चिडचीड स्पष्ट जाणवत होती. सूनबाईंनी एक जाड फाईल टेबलावर ठेवली. फाईलमध्ये वेगवेगळ्या तारखांचे Prescription ! ते बघता लक्षात आले सासुबाईंना वारंवार लघवीचे ईनफेक्शन होत होते. व त्यासाठी वारंवार औषधी घेऊन व सर्व तपासण्या सामान्य(Normal) असूनही त्यांचा त्रास काही केल्या कमी व्हायला तयार नव्हता.सहाजिकच सासू-सूनेत चिडचीड वाढली होती.आता सर्व सामान्य (Normal)असताना असे का?
सासुबाईंचे वय ५४वर्षे, त्यांची Menstrual History उलगडता असे लक्षात आले बाईंची पाळी तर ३५ वर्षाच्या वयातच गेलेली!( Premature or Early Menopause) .या कारणामुळे ईतर कुठलेही आजार जसे मधुमेह ,प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार नसताना देखील लघवीचे ईनफेक्शन(Urinary Tract Infection) त्यांचा पिछा सोडायला का तयार नव्हते???
तर याचे कारण होते कमी वयात आलेली रजोनिवृत्ती(Menopause). कमी वयात आलेल्या रजोनिवृत्ती(Menopause) मुळे शरिरातील संप्रेरकांमध्ये होणार्या बदलांमुळे ( Harmonal Changes ) स्त्रियांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागू शकते ,यात चिडचीडेपणा, घबराट(anxiety), गरम होणे(Hot flushes) ,वारंवार लघवीचे ईनफेक्शन होेणे(Repeated UTIs) ,कामेच्छा कमी होणे(decreased Sex drive)योनीमार्गात कोरडेपणा जानवणे(Vaginal Dryness) या सर्व गोष्टींचा समावेष होतो.
यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ऊपचारपद्धती अवलंबल्यास या सर्व व्याधींतून सूटका होऊ शकते व आयुष्य सुखकर होऊ शकते. ही सासू-सूनेची जोडी काही दिवसांने हसतखेळत आलेली पाहूनच पावती मिळाली!
#Each Complain Matters
#Evey complain has a treatment
#Be wise & Consult Specialist Doctor
#Improve Your Quality Of Life
Have queries or concern ?
About Author
Dr. Manisha Kulkarni
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.