Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro

Home > Blogs > Neonatology > एनआयसीयू बेबी केअर (नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग)

एनआयसीयू बेबी केअर (नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग)

एनआयसीयू बेबी केअर

एनआयसीयु याचा अर्थ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (न्यूबॉर्न इंटेंसिव्ह केअर युनिट)असा आहे. आजारी किंवा मुदतपूर्व जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी 24 तास वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या रुग्णालयासाठी हा विभाग म्हणजे वैद्यकीय सुविधेची पहिली पायरी म्हणावी लागेल.

एनआयसीयूचे प्रकार आणि बालकांना एनआयसीयूची का गरज असते हे आपण समजावून घेऊ.

एनआयसीयूचे तीन प्रकार असतात. त्यात इंटेंसिव्ह केअर एनआयसीयू, मॉडरेट लेव्हल एनआयसीयू आणि बेसिक ट्रीटमेंट एनआयसीयू यांचा समावेश आहे. भारतात सुमारे 15 टक्के बालके ही मुदतपूर्व जन्माला येतात. म्हणजेच पूर्ण 40 आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच ही बालके जन्माला येत असून त्यांना लेव्हल 3 एनआयसीयू विभागात ठेवले जाते.

बालकाला एनआयसीयूची गरज का असू शकते?

जन्मावेळी कमी वजन असणे

ज्या बाळांचे जन्मतः वजन 2.5 किलो पेक्षा कमी किंवा अगदी 1.8 किलोपेक्षा कमी वजन असणार्‍या बालकांना लेव्हल 3 एनआयसीयू विभागात ठेवले जाते.

भारतात जन्माला येणार्‍या प्रत्येक 100 बालकांपैकी 10 टक्के बालकांना एनआयसीयूची गरज भासत असून त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असले पाहिजे. बाळ जितके लहान असते तितके जास्त दिवस त्याला एनआयसीयूची गरज असते.

ज्या मुदतपूर्व बालकांचे वजन सुमारे 1.5 किलो, 1200 ग्रॅम किंवा एक किलोच्या आसपास असल्यास त्यांना एक ते दीड महिना एनआयसीयूची गरज लागू शकते. बाळाचे वजन जितके कमी तितका जास्त वेळ बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवावे लागते. 500 ते 700 ग्रॅम वजनाच्या बालकांचे जगण्याचे प्रमाण हे 40 ते 80 टक्के आहे. तर 700 ग्रॅम ते 1 किलो वजनाच्या बालकांचे जगण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे. आधुनिक काळातील वैद्यकीय सेवेच्या प्रगतीमुळे अशा बालकांच्या वाचण्याचे प्रमाण वाढत आहे,ही समाधानकारक बाब आहे.

1 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या बालकांना सर्व आधुनिक सुविधा असलेल्या एनआयसीयूमध्ये दाखल केल्यास ती वाचण्याची शक्यता 75 ते 85 टक्के असते.

श्वास घेताना होणारा त्रास

नवजात बालकांसाठी दुसरी सर्वसामान्य समस्या म्हणजे श्वास घेताना होणारा त्रास,त्यासाठी एनआयसीयूची मदत घेतली जाते. भारतात जन्माला आलेल्या 100 पैकी 10 बालके जन्मल्यानंतर रडत नाहीत. याचाच अर्थ त्यांच्या शरीरात प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. म्हणजेच अप्रत्यक्षपणे फुफ्फुसे, हृदय व मेंदू यांनाही प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तेव्हा बालकाच्या विविध अवयवांच्या प्रभाव पडू शकतो. अशा बालकांना हायपोक्सिक इस्केमिक बेबी म्हणतात व त्यांना त्वरित एनआयसीयूची गरज असते. तसेच श्वसनाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बालकांना 10 ते 15 दिवस एनआयसीयूमध्ये असणे गरजेचे असते.

संसर्ग

नवजात बालकांसाठी तिसरी सर्वसामान्य समस्या म्हणजे संसर्ग.

कावीळ

नवजात बालकांना एनआयसीयूची गरज असल्याचे चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे कावीळ. कावीळग्रस्त बालकांना एनआयसीयू उपचारांसाठी 10 दिवस ते 3 आठवडे लागू शकतात. एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या बालकांना पूर्ण बरे होण्यासाठी अद्ययावतवैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सुविधा असलेल्या वैद्यकीय सेवेनंतरही बरे होण्यासाठी काही काळ लागतोच.अद्ययावत तंत्रज्ञान आणि ज्ञानामुळे जगण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे अशा बालकांसाठी एनआयसीयुचे महत्त्व देखील वाढले आहे.

Have queries or concern ?

  About Author

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222