Home > Blogs > Pulmonary Care > धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

स्वच्छ हवा ही आपल्या आरोग्यासाठी मूलभूत गरज आहे. मात्र हवेतील प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार्‍या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे जगभरात अनेक लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हवेतील प्रदूषणामुळे सौम्य ते गंभीर अशा अनेक पद्धतीने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. एकीकडे वाढते प्रदूषण आणि दुसरीकडे खालावत चाललेली हवेची गुणवता हा एक चिंतेचा विषय आहे. यामुळे अनेक श्वसनाचे विकार उदभवू शकतात. विशेष करून थंडीच्या दिवसात गार हवेची घनता जास्त आणि त्यामुळे धुलिकण हवेत जास्त वेळ राहतात. ते नाक किंवा तोंडावाटे शरीरात गेल्यावर श्वसनाशी निगडीत विकार ,धुळीची अलर्जी,कोरडा खोकला अशा अनेक समस्या निर्माण होतात.याशिवाय प्रदूषणामुळे अस्थमा व सीओपीडीची लक्षणे तीव्र होणे असे अनेक परिणाम होतात व फुफ्फुस व हृदयासंबंधित आजारांसाठी कारणीभूत ठरतात.

हवेतील प्रदूषण करणार्‍या घटकांमध्ये ओझोन,कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड,सल्फर डायऑक्साईड,लेड आणि छोटे – मोठे कण (पार्टीक्युलेट मॅटर ) यांचा समावेश आहे.या छोट्या व मोठ्या कानांमध्ये नायट्रेट्स,सल्फेट्स,सेंद्रिय रसायने,धातू आणि माती किंवा धूळ कणांचा समावेश आहे. हवेतील प्रदूषण म्हणजे हे कण आणि द्रव थेंबाचे एक जटिल मिश्रण आहे.गाड्यांमधून होणारे कार्बन उत्सर्जन , काही कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू,फटाके,हिवाळ्यामध्ये शेतातील पिकांचे अवशेष जाळणे इत्यादींमुळे उत्सर्जित झालेले वायू आणि कण वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरतात.

वायुप्रदूषणामुळे शरीरात शिरणारे हे धुळीचे कण फुफ्फुसात साठायला लागतात. आपल्या शरीरातील या महत्वाच्या अवयवाच्या मॅक्रोफेजेस आणि लिंफॅटिकसारख्या संरक्षक यंत्रणेवर ताण पडला की श्वसनमार्गामध्ये या कणांचा साथ सुरू होतो.यामुळे तीव्र दाह किंवा फायब्रोसिस होऊ शकते आणि यावर वेळीस उपचार केले नाहीत तर फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

बाह्य प्रदूषणाबरोबरच घरातील वातावरणातील प्रदूषण (इनडोअर पोल्युशन) देखील तितकेच हानिकारक असते.धूम्रपान,विशेष करून ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लाकूड वापरणे, प्रकाशासाठी केरोसीन यांचा यामध्ये समावेश आहे.धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तीमध्ये श्वसन संस्थेच्या सर्व घटकांवर परिणाम होऊ शकतो.आपल्या शरीरातील श्वसन प्रणाली नाकापासून ते श्वसनमार्ग आणि फुप्फुसातील अल्वियोली या भागापर्यंत विस्तारित असते. अल्वियोली म्हणजे फुप्फुसांतील दोन छोट्या पिशव्या जिथे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साईडची अदलाबदल होते.धुम्रपानातील धूर हा तोंडावाटे श्वसनमार्गाद्वारे अल्वियोली पर्यंत जाऊन पोहोचतो.धूर श्‍वसनमार्गातून जाताना विरघळणारे वायू शोषले जातात आणि कण हे श्वसनमार्गात आणि अल्वियोलीच्या पृष्ठभागावर साठतात.त्यामुळे तोंडासह श्वसनमार्गाच्या सर्व घटकांना ह्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

फुप्फुसांवर प्रदूषणामुळे होणार परिणाम कमी करायचा असेल तर निसर्गाप्रती आपल्याला अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. धूम्रपान टाळणे,स्वच्छ इंधन,अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे, निसर्गाचे सौंदर्य जोपासणे,आणि ज्यांना याआधीच दमा किंवा सीओपीडी सारखे विकार आहेत त्यांचा विचार करून कमीतकमी प्रदूषण होईल याची खात्री करणे गरजेचे आहे.

Have queries or concern ?


    About Author


      Appointment Form







      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222