Home > Blogs > Pulmonary Care > धूम्रपान आणि फुफ्फुस

धूम्रपान आणि फुफ्फुस

धूम्रपान आणि फुफ्फुस

जेव्हा एखादा व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा अनेक विषारी रसायने फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात आणि फुफ्फुसांचा दाह होतो . वायुमार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर श्लेषमा ( म्युकस) निर्माण होतो . यामुळे खोकला , ब्रॉन्कायटिस किंवा निमोनिया सारख्या समस्या उदभवू शकतात . धुम्रपानामुळे आत जाणारे विषारी पदार्थ फुफ्फुसांमधील छोट्या वायु मार्गांमध्ये सूज निर्माण करतात. यामुळे छाती घट्ट झाल्याचे जाणवू शकते , घरघर किंवा श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो. जर अशा व्यक्तींनी धूम्रपानाची सवय सुरूच ठेवली तर फुफ्फुसांमध्ये होणार दाह , उतींना इजा पोहोचवू शकते आणि यामुळे श्वसनाचा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो . तंबाखू मधील चिकट घटक फुफ्फुसामध्ये साठायला लागतात . वर्षानुवर्षे धूम्रपान करत राहिल्यास , या घटकांमुळे फुफ्फुसांना काळा रंग येतो .

सिलिया हे श्वसन प्रणालीतला एक महत्वाचा भाग असतो . ते छोट्या केसांसारखे दिसतात व श्वासातून आत आलेल्या वायूमधून धूळ आणि घाण काढणायचे महत्वाचे काम करत असतात . पण धूम्रपान करताना निकोटीन मुळे सिलिआच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो . याचाच अर्थ आत येणाऱ्या वायूमधील धूळ आणि घाण , सिलिया निकामी झाल्याने वेगळे केले जाऊ शकत नाही . या स्तिथीत सर्दी आणि श्वसनाशी निगडित संसर्ग होण्याची जास्त जोखीम असते .

प्रधीर्ग काळ धूम्रपान केल्याने फुफुसातील पेशी निकामी होतात आणि कर्करोग होण्याचा धोका बळावतो . जे धूम्रपान करत नाहीत , पण इतर व्यक्ती धूम्रपान करतांना प्रधीर्ग काळ त्यांच्या संपर्कात असतात ( सेकंड हॅन्ड स्मोक ) त्यांनाही कर्करोगाचा धोका असतो. जितका काळ धूम्रपानाची सवय चालू राहील तितका धोका जास्त असतो .

Have queries or concern ?

  धूम्रपान बंद केल्याने फुफ्फुसांना फायदा होऊ शकतो का?

  ज्या क्षणी एखादी व्यक्ती धूम्रपान करणे बंद करते , तेव्हा फुफ्फुसे स्वतःला दुरुस्त करण्यासाठी सुरवात करतात. रक्तातील कार्बन मोनो- ऑक्साईड चे प्रमाण नेहमीच्या पातळीपर्यंत खालती यायला लागते . अवयवांमधून प्राणवायूचा अधिक प्रवाह सुरु होतो आणि त्या व्यक्तीला अधीक चांगल्या प्रकारे श्वास घेता यायला लागतो .

  फुफ्फुसातील सिलिया पुन्हा सक्रिय होतात . ते जसे दुरुस्त होतात , तसे प्रारंभी खोकला वाढू शकतो , पण अतिरिक्त श्लेष्मा फुफ्फुसातून बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू झाली आहे , याचे हे संकेत असू शकते. धूम्रपान ही एक घातक सवय आहे . ही सवय मोडणे सोपे नाही , पण सोडल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होतो . त्यामुळे धूम्रपान लगेच थांबवा, कठीण वाटत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या .

   

  About Author

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222