Home > Blogs > Gastroenterology > वर्ल्ड हेपॅटायटिस डे 28 जुलै 2022

वर्ल्ड हेपॅटायटिस डे 28 जुलै 2022

prevent-parkinson-disease

जीवनशैलीचा यकृतावर परिणाम होऊ देऊ नका – तज्ञ

भारतात यकृताच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना, योग्य प्रतिबंधात्मक उपायांनी या आजारांना दूर ठेऊ शकतो, याबाबत अधिकाधिक जागृती होणे महत्त्वाचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षी 28 जुलै हा दिवस वर्ल्ड हेपॅटायटिस डे चे औचित्य साधून याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हेपॅटायटिस म्हणजे यकृताचा दाह किंवा सूज येणे. हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई हे दुषित पाण्यामुळे किंवा अन्नामुळे होतो तर हिपॅटायटीस बी आणि सी हे इतर पध्दतींनी संक्रमित होतात.त्यामध्ये असुरक्षित शारीरिक संबंध, संक्रमित सिरिंजमुळे इत्यादींचा समावेश आहे. विशेषत: हिपॅटायटीस बी आणि सी दीर्घ कालावधीच्या समस्या निर्माण करू शकतात.

सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या लिव्हर अ‍ॅन्ड मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन व हेपॅटोबिलियरी सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.बिपीन विभूते म्हणाले की, बैठी किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर सर्वाधिक परिणाम दिसून येत आहेत. केवळ मद्यपानच नव्हे तर चुकीची जीवनशैली,चुकीचा आहार,व्यायामाचा अभाव हे सर्व जोखमीचे घटक ठरत आहेत. यकृताकडे दुर्लक्ष करून वेळीच निदान आणि उपचार केले नाही तर पुढील गुंतागुंत वाढण्याचा धोका बळावू शकतो. आपल्या यकृतामध्ये अतिरिक्त कार्यक्षमता असते आणि जोपर्यंत आजार पुढील टप्प्यात जात नाही तोपर्यंत सहसा लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत.

म्हणूनच ज्या व्यक्तींना आरोग्याबाबत कोणतीही समस्या नाही,अशा सामान्य लोकांनी 40 वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक दोन वर्षांतून एकदा आणि चाळीशीनंतर वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले. नियमित मद्यपानाचे सेवन करणार्‍या व्यक्तींनी देखील वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.यामुळे रोगाच्या कोणत्याही संभाव्य वाढीचे निदान करण्यात मदत होईल आणि प्रारंभिक टप्प्यातच उपचार करता येतील. यकृताचा आजार जर पुढील टप्प्यात गेला जर क्रॉनिक हेपॅटायटिस,लिव्हर सिर्‍हॉसिस,यकृताचा कर्करोग आणि इतर जीवघेणी स्थिती उद्भवू शकते.

चांगली जीवनशैली,अस्वच्छ किंवा दूषित खाद्यपदार्थ टाळणे,असुरक्षित शारीरिक संबंध टाळणे,हेपॅटायटिस बी ची लस आणि नियमित आरोग्य तपासणी यासारखे प्रतिबंधात्मक उपाय यकृताच्या आरोग्याकरिता फायदेशीर ठरू शकतात.

Have queries or concern ?

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222