Home > Blogs > Gastroenterology > Maharashtra Times Q & A – Dr Sheetal Mahajani (Dadphale)

Maharashtra Times Q & A – Dr Sheetal Mahajani (Dadphale)

Maharashtra Times Q & A - Dr Sheetal Mahajani (Dadphale)

यकृताचा आजार असलेल्या व्यक्तींचा आहार कसा असावा ?

यकृताच्या आजाराच्या उपचारांमध्ये आहार हा महत्त्वपूर्ण घटक असतो. अशा व्यक्तींनी समतोल आहार घ्यावा. त्यामध्ये प्रथिनेयुक्त आहाराबरोबर दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळविण्यासाठी मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट व चरबीयुक्त प्रकारातील पदार्थांचा समावेश असावा. यकृताचा कोणत्या प्रकारातील आजार झाला आहे,यावर आहार अवलंबून असतो.

हेपॅटायटिस असलेल्या रूग्णांनी कोणता आहार घ्यावा ?

बाहेरील दूषित अन्न व पाणी प्यायल्याने उद्भवणार्‍या हेपॅटायटिस ए,ई (कावीळ) व्यक्तींमध्ये सुरूवातीच्या टप्प्यात भूक न लागणे,खाण्याची इच्छा न होणे,उलटी होणे यांसारखी लक्षणे आढळतात. अशा वेळी घरात तयार करण्यात येणारे साधे व ताजे खाद्यपदार्थ खावेत.भुक आपोआप परत यायला लागते,ती आल्यावर पुन्हा संतुलित आहार सुरू करावा. प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सोसेल असेच खावे.भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.शक्यतो पिण्याचे पाणी उकळून घ्यावे.या आजाराचा प्रसार घरातील इतर लोकांना होऊ नये यासाठी रूग्णांचे ताट वेगळे असावे.त्याचबरोबर घरात विशेष करून शौचालयात स्वच्छता राखावी.

Have queries or concern ?

    यकृताचा सिर्‍हॉसिस असलेल्या रूग्णांनी कोणता आहार घ्यावा ?

    यकृताचा सिर्‍हॉसिस उद्भवल्यावर पोटाचा आकार वाढू लागतो. थोडेसे जरी अन्न व पाण्याचे सेवन केल्यास देखील पोट फुगू लागते. त्यामुळे रूग्णाला योग्यरित्या जेवण करता येत नाही.पोटातील पाण्यामुळे जठरावर दबाव निर्माण होतो,त्यामुळे यकृताचा सिर्‍हॉसिस झालेल्या व्यक्तीने मर्यादित प्रमाणात संतुलित खाद्यपदार्थ खावेत,मात्र या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने व कॅलरीज,जीवनसत्त्वे,पोषक घटक असलेल्या उदा.घरातील चपाती,लाडू,पनीर,भात यांचा समावेश असावा.अशा प्रकारच्या आहारामुळे शिथिल झालेल्या स्नायूंना ताकद मिळण्यास मदत होते.

    About Author

    DrSheetalMahajani

    Dr. Sheetal Mahajani (Dhadphale)

    Director – Transplant Hepatology
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1238" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222