Home > Blogs > Gastroenterology > यकृतावरील उपचार
यकृतावरील उपचार
यकृताच्या आजारांवरील उपचार ४ प्रकारात विभागता येतील-
- अचूक निदान करून, निदाना प्रमाणे उपचार करणे
- यकृताच्या आजारामुळे ओढविणाऱ्या गुंतागुंतीचा उपचार
- अंतिम टप्प्यातील यकृताच्या आजारासाठी यकृत प्रत्यारोपण
- जीवनशैलीत करावयाचे बदल. यकृताची काळजी घेताना आजाराचा प्रकार, आजाराची तीव्रता, त्यामुळे दुसऱ्या अवयवांवर झालेले परिणाम, आजारामुळे झालेला शरीराचा ऱ्हास आणि कुपोषण या सर्व बाबींचा विचार करावा लागतो.
अचूक निदान करून पुढील प्रमाणे उपचार करता येतात.
- मद्यपानामुळे होणाऱ्या आजारात, मद्यपान सोडल्यामुळे सुरुवातीच्या काळात बदल घडविता येतो.
- विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांसाठी विशेषतः बी,सी विषाणूंसाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत.
- फॅटी लिव्हरच्या आजारासाठी काही उपयुक्त औषधे संशोधन करून उपलब्ध केली जात आहेत. त्याचबरोबर जीवन शैलीत बदल घडवून या आजाराचे प्रमाण कमी केले जाऊ शकते.
- ऑटोइम्युन प्रकारच्या यकृताच्या आजारासाठी स्टिरॉइड्स आणि काही इम्यूनोसप्रेशन ची औषधे लागू पडतात.
- रक्तवाहिन्यांच्या आजारावर रेडिओलॉजिकली शिरेतून शस्त्रक्रिया करता येते.
- प्रतिजैविकांचा वापर करून यकृतातील जंतूसंसर्ग/गळू बरा करता येतो.
- यकृताच्या कर्करोगावर, त्याच्या टप्प्याप्रमाणे योग्य उपचार करता येतो.
- चेलेशन थेरेपीचा विल्सन रोगामध्ये प्रभावी उपयोग होतो.
यकृतामुळे उद्भवणाच्या गुंतागुंतीचा उपचार यकृतात कायमस्वरूपी बिघाड झाल्यावर रक्ताची उलटी / संडास होणे, मूत्रपिंडावर परिणाम होणे, वारंवार झोप येणे, पोटात पाणी होणे यासारख्या व्याधी दिसू लागतात आणि व्यावर योग्य त्यावेळी उपचार न केल्यास गंभीर रूप धारण केले जाऊ शकते. यकृतामुळे गुंतागुंत वाढल्यास यकृत रोपण हा प्रभावी आणि आयुष्यमान वाढविणारा उपाय ठरतो.
Have queries or concern ?
About Author
Dr. Sheetal Mahajani (Dhadphale)
Director – Transplant Hepatology
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.