Home > Blogs > Infectious Diseases > कोविडनंतरच्या विविध साथी आणि डेंग्यू
कोविडनंतरच्या विविध साथी आणि डेंग्यू

कोविडपासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये नंतर साधारण कोणते आजार आढळतात?
अनेक रुग्णांना कोविडमधून बरे झाल्यानंतर शरीरात रक्त घट्ट होण्याचा त्रास होतो. त्यातून त्यांच्या रक्तात गुठळ्या तयार होतात. हा प्रकार हात किंवा पायांच्या नसांमध्ये घडले तर यामुळे थ्रोम्बोसिस आणि नंतर गॅंगरिन होऊ शकते. या गाठी कुठेही होऊ शकतात. जर त्या मेंदूमध्ये झाल्या तर यामुळे स्ट्रोक किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.
अनेकांमध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये तर केस गळण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. अर्थात, हे कोविडचेच साइड इफेक्ट आहेत किंवा नाहीत हे पुरेसे स्पष्ट झालेले नाही.
कोविडचा नवीन व्हेरिएंट त्यांच्याबरोबर नवीन रोग आणतात., असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझ्या ऑन्कोलॉजिस्ट मित्राच्या मतानुसार, गेल्या दीड वर्षांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पण याचा कोविडशी काहीही संबंध नाही.
याचे कारण असे होते की, जे कोविडची शक्यता तपासण्यासाठी सीटी स्कॅन करायला गेले त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. एका अर्थी, हे बरेच झाले म्हणायचे कारण त्यामुळे अशा रुग्णांचे निदान वेळेत झाले आणि पुढील उपचारासही वेळ मिळाला.
संसर्गजन्य आजार आणि डेंग्यू
डेंग्यू गेल्या पाच दशकात संपूर्ण जगात पसरला आहे. शहरीकरणामुळे डेंग्यूच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. कालांतराने त्यात दहा पटीने वाढ झाली आहे. आम्हा डॉक्टरांपुढे दरवर्षी डेंग्यू आणि मलेरियाची अनेक प्रकरणे समोर येत असतात.
परंतु विशेष म्हणजे, आम्ही गेल्या वर्षी डेंग्यूच्या कोणत्याही प्रकरणाबद्दल ऐकले नाही. आता दुसऱ्या लाटेनंतर कोविडची प्रकरणे कमी होऊ लागल्यानंतर, या वर्षी डेंग्यूची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून आले.
कोविड आणि डेंग्यू यांच्यात कोणताही संबंध नाही. दोन्ही रोग भिन्न लक्षणे दर्शवतात आणि लोकांना संक्रमित करण्याची त्यांची पद्धत देखील भिन्न आहे.
डेंग्यू हा आजार डास चावल्यामुळे होतो. हा डास लोकांना सकाळी चावतो. म्हणूनच सर्वात जास्त प्रभावित झालेले रुग्ण हे तरुण आहेत, जे दिवसा नोकरीसाठी प्रवास करत असतात. सर्व प्रकारचे फ्लू, मग तो इन्फ्लूएन्झा असो किंवा डेंग्यू, मलेरिया किंवा सामान्य फ्लू हे सर्व तापाने सुरू होतात.
यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. परंतु या हंगामात ते नेहमीच वाढतात. डेंग्यू आणि मलेरियामुळे तुम्हाला खूप जास्त ताप येतो. परंतु डेंग्यूच्या तुलनेत कोरोनामधील ताप खूपच सौम्य असतो. डेंग्यूमध्ये तुमचे संपूर्ण शरीर दुखते. कोविड असे कोणतेही लक्षण दर्शवत नाही.
Also Read : Dengue Fever: Causes, Symptoms & Treatment
लसीकरणामुळे आपणास अन्य संसर्गांपासूनही संरक्षण मिळते का?
लस आपल्याला व्हायरसपासून पूर्णपणे रोगप्रतिकारक बनवत नाही, परंतु व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिपिंडे तयार करते. म्हणूनच याचा अर्थ असा नाही की, आपण कोविडने प्रभावित होणार नाही. आपली प्रभावित होण्याची शक्यता कमी होऊ शकते परंतु ती नाहीशी होणार नाही.
प्रत्येक लस विशिष्ट विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी तयार केली जात असल्याने ती इतर विषाणूंवर परिणाम करत नाही. जर दोन व्हायरसचे काही घटक समान असतील, तर ते तुम्हाला एकमेकांविरुद्ध काही प्रमाणात प्रतिकार विकसित करण्यास मदत करू शकतात.
याशिवाय विषाणू नेहमीच विकसित होतात आणि स्वतःचे नवीन व्हॅरिएंट तयार करतात. म्हणून जुन्या व्हॅरिएंटशी लढण्यासाठी तयार केलेली लस नवीन व्हॅरिएंटमध्ये काम करू शकत नाही.
Have queries or concern ?
डेंग्यू किती घातक असतो?
डेंग्यूने प्रभावित होणे म्हणजे डासांच्या चाव्यामुळे व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करणे. डेंग्यूचा मृत्यूदर अर्धा टक्का आहे. म्हणजे 200 पैकी 1 रुग्ण डेंग्यूमुळे दगावतो. डेंग्यूचे मुख्य लक्षण म्हणजे खूप ताप येणे. डेंग्यूमध्ये रुग्णांच्या शरीराचे तापमान खूप वेगाने वाढते. तापमानात झालेली ही वाढ डिहायड्रेशनला कारणीभूत ठरते.
रुग्णांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते आणि त्यांचे रक्त घट्ट होऊ लागते. यामुळे रक्तामध्ये गुठळ्या होतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात बाधा निर्माण होऊ शकते. हे सर्व प्लेटलेट्सची संख्या कमी करण्यास कारणीभूत ठरते.
प्लेटलेट्समध्ये झालेली ही घट रुग्णाच्या शरीरात आंतरिक रक्तस्त्राव करण्यासाठी जबाबदार ठरते. हे सर्व रक्त रुग्णांच्या फुफ्फुसात जमा होऊ शकते अशीही शक्यता असते, ज्यामुळे रुग्णांना श्वास घेणे कठीण होऊ शकते. याशिवाय डेंग्यूमुळे रुग्णांच्या शरीरास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जे कायमस्वरूपी असू शकते.
तांत्रिकदृष्ट्या डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णाला आयव्हीद्वारे प्लेटलेटची चढवण्याची आवश्यकता नसते. दहापैकी एका रुग्णाला याची गरज असते. आपले शरीर सातव्या ते आठव्या दिवशी प्लेटलेट्सचे पुनरुत्पादन करण्यास सुरवात करते. जर ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू झाली नाही तरच रुग्णांना प्लेटलेट्स देणे आवश्यक असते. योग्य आहार, हायड्रेशन पातळी राखणे आणि प्लेटलेट्स देखरेख हे डेंग्यू बरे करण्याचे तीन मुख्य टप्पे आहेत.
Also Read : Dengue Symptoms in Children
आगामी तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय करायला हवे?
भविष्यात आपल्याला अनेक साथीच्या रोगांच्या लाटांचा सामना करावा लागेल. आपण आपला त्रास कसा कमी करायचा हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. जर आपण सांगितलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे आपलेच नुकसान होणार आहे. जर आपण काही सोप्या गोष्टींचे पालन केले तर आपण या लाटेवर मात शकतो.
या खूप सोप्या गोष्टी आहेत जसे की, मास्क घालणे, वारंवार हात धुणे, बाहेर असताना आपले डोळे, तोंड आणि नाक यांना स्पर्श नकरणे, आपण लसीकरण केले तरीही प्रभावित होण्याची शक्यता दुर्लक्षित न करणे. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारच्या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे. जर आपण या नियमांचे पालन करण्याचे सुनिश्चित केले तर आपण पुढील लाटेवर मात करु शकतो.
About Author
Patient Feedback

Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde

All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade

All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap

All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.