Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > व्हेरीकोज व्हेन्स ला घाबरू नका

व्हेरीकोज व्हेन्स ला घाबरू नका

Dr. Kaurabhi ZadeInterventional Radiologist

Don't-be-afraid-of-varicose-veins-marathi

व्हेरीकोज व्हेन्स ही स्थिती शरीरावर कुठेही होऊ शकते,मात्र सामान्यत: पायावर दिसून येते.या पायाच्या सुजलेल्या पिळलेल्या नसा/शिरा दिसून येत असल्याने व्हेरीकोज व्हेन्स ने ग्रस्त असलेल्या लोकांना अस्वस्थ वाटते. ही समस्या रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेल्या दाबामुळे उद्भवू शकते.

त्वचेच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या नसांमध्ये व्हेरीकोज व्हेन्सची स्थिती उद्भवते.हृदयाकडे जाणारे रक्त हे नसांमधून एका मार्गाने जात असते,जेव्हा त्यामधील वॉल्व्ह कमकुवत होतात किंवा खराब होतात त्यावेळेस नसांमध्ये रक्त साठायला सुरूवात होते आणि नसा सुजायला लागतात.अशा परिस्थितीत जास्त वेळ बसले किंवा उभे राहिले गेले तर नसांमधील दाब वाढतो.वाढलेल्या दाबामुळे या नसा ताणल्या जातात आणि परिणामी नसांच्या भिंती कमकुवत होऊन खराब होतात. 

जे लोक सतत उभे राहून किंवा बसून काम करतात अशा लोकांमध्ये व्हेरीकोज व्हेन्सचे प्रमाण अधिक दिसून येते. याबरोबर एकापेक्षा अधिक गर्भधारणा झालेल्या महिलांमध्ये देखील याचे प्रमाण अधिक दिसून येते. काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकतेमुळे व्हेरीकोज व्हेन्सची समस्या आढळून येते.

व्हेरीकोज व्हेन्सची लक्षणे ही प्रत्येक रूग्णामध्ये भिन्न असू शकतात. पायातील शिरा फुगणे व आराम केल्यावर पूर्वस्थितीत येणे हे काहींच्या बाबतीत घडू शकते. जास्त वेळ उभे राहिल्याने वेदना वाढणे व आराम केल्यावर वेदना कमी होणे ही देखील लक्षणे दिसून येतात.

काही लोकांमध्ये फक्त सूज दिसून येते आणि आराम केल्याने ती निघून जाते,मात्र या टप्प्यात उपचार न घेतल्यास ही समस्या पुढील टप्प्यात जाऊ शकते.या टप्प्यात पायामध्ये खाज जाणवते आणि त्वचा काळी,लाल पडू शकते व तिथे जखम होऊ शकते.

वैद्यकीय तपासणी,त्याच्याबरोबर डॉपलर टेस्ट सारख्या चाचण्यांद्वारे रूग्णाच्या नसा,वॉल्व्ह किती प्रमाणात खराब झाल्या आहेत,त्यातील रक्ताच्या गाठी किंवा अडथळा असल्याचे समजते.त्यानुसार पुढील उपचारपध्दती ठरविल्या जातात.

रूग्णाच्या डॉपलर चाचणीच्या परिणामावर उपचारपध्दती अवलंबून असते.या चाचणीद्वारे व्हेन्स किती प्रमाणात खराब झाल्या आहेत,हे समजते.सुरूवातीच्या टप्प्यातच या आजाराचे निदान झाल्यास शस्त्रक्रिया न करता उपचार करता येऊ शकतात.ज्यामध्ये स्टॉकिंग्सचा (घट्ट मोजे ),जे घोट्यापासून मांडीपर्यंत असतात. हे दररोज 8 ते 10 तास वापरणे गरजेचे असते.

जर यामुळे रूग्णाला फायदा होत असेल तर हीच उपचार पध्दती पुढील 6 ते 8 महिन्यांपर्यंत सुरू ठेवली जाते.मात्र, वॉल्व्ह खराब झाले असल्यास,जखम होत असेल तर शस्त्रक्रिया करणे गरजेचे ठरू शकते. ही पिन होल शस्त्रक्रिया बिनटाक्याची शस्त्रक्रिया असून लेझरच्या माध्यमातून केली जाते. ज्यामध्ये छोटीशी सुई ही पायाच्या आतमध्ये घालून खराब झालेल्या नसा बंद केल्या जातात. या प्रक्रियेनंतर रूग्णाला त्रास कमी होतो.

प्रक्रियेनंतर दुसर्या दिवशी रूग्णाला डिस्चार्ज देऊ शकतो व त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडत नाही. या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला आराम करण्याची आवश्यकता नसते.दुसर्या दिवशी तो आपली दैनंदिन कार्ये करू शकतो.

बर्‍याच लोकांसमोर हा प्रश्‍न पडतो की भविष्यात व्हेरिकोज व्हेन्स होऊ नये यासाठी काय करावे.तसा ठोस कोणताच मार्ग नाही,पण यासाठी कारणीभूत असणार्‍या जोखमीं कमी करण्याकडे लक्ष द्यावे.जास्त वेळ उभे राहणे किंवा बैठे काम करणार्या व्यक्तींमध्ये व्हेरिकोज व्हेन्स होण्याची जोखीम जास्त असते.

जर अधिक काळ उभे राहत असेल तर अर्धा तासाला 2 ते 3 वेळा पायांचे तळवे वर-खाली करून व्यायाम करणे गरजेचे आहे. जास्त वेळचे बैठे काम असेल तर अर्धा तासाने चालत एक फेरी मारून येणे गरजेचे ठरेल. चालताना किंवा पायाचे व्यायाम करताना पायाचे स्नायू कार्यरत होतात आणि त्यात जमा झालेले रक्त हृदयाकडे प्रवाहित होण्यास सुरूवात होते.याबरोबर अधूनमधून एकदा पायांची मालिश करणे योग्य ठरू शकते.ज्यामुळे पायातील नसांना रक्ताभिसरण करण्यासाठी अतिरिक्त दबाव मिळू शकतो.

शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपीस्ट तुम्हाला योग्य व्यायाम व जीवनशैलीमध्ये बदल करण्याबाबतचा सल्ला देऊन मदत करतात.तसेच नियमित व्यायाम करणे,वजन नियंत्रणात ठेवणे,आहारात मीठाचे,फायबरचे प्रमाण कमी ठेवावे,उंच टाचेची पादत्राणे टाळणे,बसण्याची किंवा उभे राहण्याच्या स्थितीत बदल करणे गरजेचे आहे.

About Author

dr stock

Dr. Kaurabhi Zade

Consultant – Interventional Radiologist
Contact: +91 88888 22222
Email – [email protected]

View Profile

  Appointment Form

  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Expert Doctors

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now: 88888 22222